युक्रेनच्या लोकांनी उगवला सूड : रशियाच्या दोन सैनिकांचा मृत्यू
युक्रेनसोबतच्या युद्धात पुतीन यांच्या सैन्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. नव्या दाव्यानुसार खारकीव्हनजीक रशियाच्या सैनिकांचा विषारी ब्रेड खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. सैनिकांना हा ब्रेड युक्रेनियन नागरिकांना ‘गिफ्ट’ म्हणून दिला होता. युक्रेनच्या एका गुप्तचर यंत्रणेने हा दावा केला आहे. इजियम नागरिकांकडून देण्यात आलेला ब्रेड खाल्ल्यावर रशियाच्या थर्ड मोटर रायफल डिव्हिजनच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे.
विषारी अन्न खाल्ल्याने 28 सैनिक आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. तर नागरिकांकडून देण्यात आलेले विषारी मद्य प्राशन केल्यावर शेकडो सैनिक गंभीर स्वरुपात आजारी पडले आहेत. युक्रेनचे नागरिक शक्य असलेल्या सर्व मार्गांनी रशियाच्या सैनिकांना विरोध करत आहेत. इजियमच्या स्थानिक नागरिकांनी रशियाच्या सैनिकांचे स्वागत ‘विषारी ब्रेड’ने केले होते. रशियाच्या थर्ड मोटर रायफल डिव्हिजनचे सुमारे 500 सैनिक विषारी मद्यप्राशनानंतर रुग्णालयात दाखल आहेत.