चिपळूण
कोरोनामुळे प्रशासनाकडून गणेशविसर्जनावर निर्बंध घालण्यात आले. यासाठी नगर परिषदेने कृत्रिम हौद तसेच निर्माल्य संकलनासाठी व गणेशमूर्तींची वाहतूक करण्यासाठी कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱया वाहनांचा वापर केला. यामुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याने संबंधित अधिकाऱयांवरील कारवाई&साठीचे निवेदन बुधवारी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत हिंदू बांधवांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, हा प्रकार हिंदूसंघटनांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना या गाडय़ा आम्ही धुऊन वापरत आहोत, अशी उत्तरे देण्यात आली. या सर्व प्रकारामुळे हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्या असून याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी नॅशलिस्ट कझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष रंजिता ओतारी, नगरसेवक शशिकांत मोदी, मनसे शहरप्रमुख गणेश भोंदे, हिंदू जनजागृती समितीचे सुरेश शिंदे, संतोष पवार, सिध्देश साळवी, जयेश गुहागरकर, मनसे खेड उपतालुकाध्यक्ष नाना चाळके, शुभम पिंपळकर, संग्राम पुजारी आदी उपस्थित होते.