-दुकाने, फेरीवाले, खाद्य विक्री स्टॉल बंद
प्रतिनिधी/कोल्हापूर
सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाच्या मार्गावर रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच फेरीवाले आणि खाद्य विक्री करणाऱया स्टॉलला बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
शहरामध्ये उद्या, रविवारी सकाळ 9 वाजल्यापासून सार्वजाणिक गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मार्गावरील दुकानातील गर्दीमुळे तसेच फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये. सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडू नये म्हणून महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संपूर्ण विसर्जन मार्गावरील दुकाने, फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल यांना रविवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेकडून माईकवरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन
विसर्जन मार्गावरील सर्व दुकाने, फेरीवाल्यांनी रविवारी व्यवसाय बंद ठेवावे, असे आवाहन शुक्रवारी सायंकाळी महापालिकेच्यावतीने चारचाकी वाहनातून फिरून माईकवरून करण्यात आले.
दुकाने, फेरीवाले बंद असणारे मार्ग
महाद्वार रोड, शिवाजी पुतळा ते पापाची तिकटी, पापाची तिकटी ते गंगावेश, गंगावेश ते रंकाळा टॉवर, रंकाळा टॉवर ते इराणी खण,. संपूर्ण रंकाळा परिसर, इराणी खण परिसर, ताराबाई रोड ते रंकाळा टॉवर, बिंदू चौक ते मिरजकर तिकटी, मिरजकर तिकटी ते पाण्याचा खजिन, मिरजकर ते उभा मारूती चौक
फेरीवाल्यांमध्ये नाराजी
कोरोनामुळे अनेक दिवस व्यवसाय बंद असल्यानमुळे फेरीवाल्यांची दयनीय आवस्था झाली आहे. सार्वजाणिक गणेश विसर्जनावेळी फेरीवाल्यांचा व्यवसाय होतो. मात्र, प्रशासनाने रविवारी व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. प्रशसनाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त होत आहे.