1 हजार 255 कोटींची गुंतवणूक – मोबाईल निर्मितीला मिळणार बळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍपल इंकची कंत्राटदार निर्मिती तैवानी कंपनी विस्ट्रॉन यांनी ऍपलच्या भारतीय कारखान्यात गुंतवणूक केली असल्याचे समजते. मोबाइल निर्मिती करणाऱया ऍपलच्या उद्योगात सदरची गुंतवणूक ही 1 हजार 255 कोटी रुपयांची करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
‘ऍपल’ कंपनीने भारतातच मोबाईल उत्पादन कारखाना सुरू केला असून भारत सरकारच्या पीएलआय योजनेचा लाभ कंपनीने उठवला आहे. चार वर्षाच्या कालावधीत सदरच्या योजनेचा लाभ कंपनीला उठवावा लागणार आहे. ऑगस्ट 2020 ते मार्च 2021 च्या काळात विस्ट्रॉनने अंदाजे 1 हजार 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे जी एकूण गुंतवणुकीच्या माध्यमातून विचार करता 25 टक्के इतकी होते.
पेगाट्रॉनची अद्याप गुंतवणूक नाही
विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन या दोघांनी भारतात ऍपल फोन्सच्या निर्मितीचे कारखाने पीएलआय स्कीमअंतर्गत सुरू केले आहेत. या दोहोंनी मिळून आतापर्यंत 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यातील तिसरी कंपनी पेगाट्रॉनने मात्र अजूनही भारतात कारखाना सुरू केलेला नाही. पाच वर्षाच्या काळात ऍपलला भारतातून 3 लाख 40 हजार कोटी रुपयांचे मोबाइल फोन्स तयार करायचे आहेत.
वर्षाला 250 कोटी गुंतवावे लागणार
सदरच्या पीएलआय योजनेंतर्गत पाचही जागतिक स्तरावरील कंपन्यांना वार्षिक स्तरावर किमान 250 कोटी रुपये प्रत्येक वर्षाला इतकी गुंतवणूक करण्यासंबंधी सरकारने सूचना केली आहे. चार वर्षाच्या कालावधीत 1 हजार कोटींची गुंतवणूक अशाप्रकारे शक्य होणार आहे.