वृत्तसंस्था/ मुंबई
विमान सेवा कंपनीमध्ये कार्यरत असणारी विस्ताराची दिल्ली ते प्रँकफर्ट (जर्मनी) यादरम्यान ‘एअर बबल ऍग्रीमेंट’च्या आधारे थेट उड्डाणांची सुरुवात करण्यात येणार आहे. विस्ताराने याबाबत नुकतीच माहिती दिली आहे. जर्मनीचे प्रथम सेवेमध्ये बोईंग 787-9 ड्रीमलायनर हे विमान आहे. हे उड्डाण सकाळी 3.30 वा. दिल्लीतून प्रारंभ होणार आहे आणि 7.55 वाजता प्रँकफर्टमध्ये उतरणार असल्याची माहिती आहे. या उड्डाणामध्ये टाटा-सिंगापूर एअरलाईन्सच्या संयुक्त विमान कंपनी विस्तारा यांनी आठवडय़ातील दोन वेळा आणि शनिवारी दोन शहरांच्या दरम्यान उड्डाण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.