सांगली : प्रतिनिधी
सांगली येथे विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे येथील संचालक विकास पाटील यांनी रबी हरभरा प्रात्यक्षिक प्लॉटला भेट दिली व प्रात्यक्षिकाची पाहणी केली.
पाटील यानी शेतकरी शिवाजी चौगुले यांच्या हरभरा प्रात्यक्षिक प्लॉटला भेट दिली व पिक प्रात्यक्षिकांमध्ये वापरलेले तंत्रज्ञान त्यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी चौगुले म्हणाले, ” यापूर्वी होत असलेले हरभरा उत्पादन हे कमी होतं. शेतीशाळेच्या माध्यमातून सांगितलेले तंत्रज्ञान आम्ही शेतीमध्ये वापरल्यामुळे हरभरा उत्पादनामध्ये निश्चित वाढ झालेली आहे. यापूर्वी आम्ही सर्वसाधारणपणे एकरी पाच ते सहा क्विंटल एवढे उत्पादन घेत होतो. परंतु आज उत्पादन दर लक्षात घेतले तर ते तर ते दहा क्विंटलपर्यंत निश्चित होईल.”
मंडळ कृषी अधिकारी महादेव खुडे व कृषी सहाय्यक अमित सूर्यवंशी यांनी शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांना अवगत केलेले तंत्रज्ञान संग्रहित छायाचित्रच्या माध्यमातून संचालक पाटील यांना दाखवले. त्यांनी विस्तार व प्रशिक्षण यांनी समाधान व्यक्त करत, हरभरा पीक घाटे भरण्याच्या अवस्थेत असताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे व त्यामुळे घाटे पूर्ण भरण्यास चांगली मदत होते. तसेच उत्पादनामध्ये वाढ होते, असे सांगितले. या दौऱ्याच्या वेळी तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, मंडळ कृषी अधिकारी महादेव खुडे, कृषी पर्यवेक्षक रवी माने, कृषी सहाय्यक अमित सूर्यवंशी व शेतकरी उपस्थित होते.