ओटवणे/ प्रतिनिधी-
विश्व हिंदू परिषदेच्या सावंतवाडी प्रखंडाच्या माध्यमातून दुर्गमस्थानी असलेल्या फणसवडे व ओवळीये गावातील गरजूंना धान्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातावळेकर, विश्व हिंदू परिषदेचे सावंतवाडी प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत कराड, तालुका कार्यकारणी सदस्य सुनील सावंत. गौरव शंकरदास, ओवळीये सरपंच विनायक सावंत, फणसवडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गावडे, भास्कर गावडे आणि दोन्ही गावातील विहीपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दोन्ही गावातील गरर्जुंसह उपस्थितांनी विहिपचे आभार मानले