प्रतिनिधी / वारणानगर
पन्हाळा तालुक्यातील काखे रोडवर कोडोली येथे असणाऱ्या वारकरी मळ्यातील जुन्या विहीरीचे दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानकपणे बांधकाम कोसळून विहीर मालकासह तिघांचा यामध्ये सापडून जागीच मृत्यू झाला तर या बांधकामावर असणारे दोन मजूर गंभीर जखमी झाले आज शनिवार दि.९ रोजी सायंकाळी घडली.
कोडोली येथील वारकरी मळ्यात महेश दत्तात्रय वारकरी यांच्या जुन्या विहरीचे बांधकाम दुरुस्तीचे काम सुरू होते सायकांळच्या सुमारास मालक महेश वारकरी मित्र सिंकदर जमादार याला घेवून हे बांधकाम पहायला गेले होते ते दोघे विहरीच्या कटड्यावरून बांधकाम पहात असताना अचानकपणे बांधकाम कोसळून हे दोघे विहरीत गाडले त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गळ्यापर्यन्त ढिगाऱ्यात अडकून पडल्याने व वाचवता न आल्याने अमोल संजय सदाकळे याचा मृत्यू झाला.यावेळी विहरीत बांधकामाचे काम करीत असलेले ठेकेदार प्रकाश यशवंत व नेताजी पाटोळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
अमोलला मिळाली जिवंत जल समाधी
वारकरी यांच्या विहरीवर अमोल सदाकळे कामावर होता. विहीर ढाळसत चालली होती. त्यावेळी त्याच्या गळ्यापर्यंत ढिगारा पडला होता. तो जीवंत होता शेकडोच्या संख्येने ही दुर्घटना पहाण्यास जमाव देखील जमला होता. अशा जमावाला तो मला वाचवा म्हणून टाहो फोडून आर्त विनवनी करीत होता. त्यावेळी मारूती गायकवाड याने क्रेनच्या सहाय्याने उतरत अमोलच्या भोवतीचा ढिगारा काढत होता त्याला वाचवण्यात यश देखील आले असते परंतु पुन्हा बांधकाम कोसळू लागल्याने क्रेन बाजूला घ्यावी लागली अशातच पुन्हा कोण विहरीत उतरण्याचे धाडस करेना. विहरीतील पाण्याची पातळी देखील वाढू लागली त्यामुळे अखेर नाका तोंडात पाणी जाऊन बुडत अमोलला सर्वासमक्ष जिवंत जल समाधी मिळाली. उपस्थितांच्या हातात हे दृष्य पहाण्याशिवाय व हळहळण्या शिवाय काहीच राहिले नाही.
…………………………….
तिघांचे प्राण वाचले
विहीर दुरूस्तीच्या कामावर माल तयार करून देण्याचे काम करणाऱ्या भारती चव्हाण, शामराव गायकवाड, अनिल दाभाडे यांचे काम वरती सुरू असल्याने त्याचे प्राण वाचले.
………………………………….
घटनास्थळी तरुणांची मदत, तत्परता
सायकांळच्या सुमारास घटना घडल्याने व घडलेल्या घटनेची माहीती वेगाने गांवात पसरली तातडीने पोलीस यंत्रणा, आपतकालीन व्यवस्था आल्या तथापी गांवातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यानी जेसीबी, क्रेन सर्च लाईट याची व्यवस्था करीत तरूणानी मदत व तत्परता दाखवली
………………..
विहीर दुर्घटनेतील मयत जखमीना कोडोली उपजिल्हा रुग्णालयात आणलेवर जखमीना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पीटलला हलवण्यात आले. शाहूवाडी उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक अनिल कदम यानी घटनास्थळी तातडीने भेट दिली कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे मोठ्या पोलीस संखेने या कामी मदत करीत होते रात्री उशीरा या गुन्ह्याची नोंद पोलीसात झाली आहे.