प्रतिनिधी/ लांजा
विहिरीत पडलेल्या वयोवृद्ध महिलेला लांजा शहरातील जिगरबाज तरुणांनी विहिरीतून बाहेर काढून तिचे प्राण वाचवले. ही घटना सोमवारी सकाळी शहरातील लांजा चव्हाटा मंदिरनजीक घडली.
लांजा शहरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीनजीकच्या विहिरीत सोमवारी सकाळी एक वयोवृद्ध महिला पाय घसरून पडली. ही माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक मंगेश लांजेकर यांच्यासह प्रकाश लांजेकर, राजेश भडेकर, तुषार लांजेकर, नीलेश लांजेकर, प्रमोद बेलवलकर, निकील शेटय़े, विपुल कोत्रे, नवनीत लांजेकर, नरेश भुरके व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर संदीप भडेकर यांनी विहिरीत उतरून पाळण्याच्या मदतीने त्या महिलेला बाहेर काढले.