सावंतवाडी /प्रतिनिधी-
वि स खांडेकर विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी पूजा पेडणेकर उपस्थित होत्या.शाळेतील विद्यार्थिनींनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केल्याबद्दल माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजाराम पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन श्री धुमाळे सर तर आभार श्री परीट सर यांनी मानले.यावेळी श्री कोळी सर व सौ. कुंभार मॅडम यांची उपस्थिती होती. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली .