बर्निंग ट्रॉलीच्या प्रकाराने केदनूर ग्रामस्थांत एकच गोंधळ; शेतकऱयाचे मोठे नुकसान
वार्ताहर /कडोली
मण्णीकेरीहून कटणाहोसूर (अंकले)कडे गवत घेऊन जाणाऱया ट्रॉलीला खांबावरील वीजतारेचा स्पर्श झाल्याने भीषण आग लागल्याने केदनूर गावात एकच गोंधळ उडाला.
सोमवारी सायंकाळी वाळलेल्या गवताने भरलेली ट्रॉली मण्णीकेरी येथून कटणाहोसूरकडे जात असताना केदनूर गावात भर रस्त्यात खांबावरील तारेचा स्पर्श होऊन गवताने पेट घेतले. त्यामुळे वस्तीत झालेल्या प्रकाराने ग्रामस्थांत एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूंनी घरे होती. त्यामुळे काय करावे, हे कळेनासे झाले होते. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत गावातील ग्रामस्थांनी घरातील पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनुचित घटना घडली नाही. अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर कर्मचाऱयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग थोडी आटोक्मयात आल्यानंतर सदर पेटती ट्रॉली बाहेर खुल्या जागेत नेण्यात आली व त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्मयात आणून ट्रॉलीतील पेटते गवत बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामुळे ट्रॉलीचे कोणतेही नुकसान झाले नाही.मात्र ट्रॉलीतील गवताचे मोठे नुकसान होऊन कटणाहोसूरमधील बसव भेंडीगेरी या मालकाला मोठा आर्थिक फटका बसला. एकंदरीत भर वस्तीतील रस्त्यावर द बर्निंग ट्रॉलीचा प्रकार झाल्याने ग्रामस्थांत एकच गोंधळ उडाला. सर्वांनी दक्षता घेतल्याने मोठा अनर्थ टळला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.