प्रतिनिधी/ कुडचडे
कुडचडेचे आमदार असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यावर शुक्रवारी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. विविध स्तरांतील मान्यवर व कुडचडेतील असंख्य कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून कॉल करून वा एसएमएसच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्याची माहिती कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत देसाई यांनी दिली.
शुक्रवारी काब्राल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कुडचडे पोलीस स्थानकाचे निरीक्षक रवींद्र देसाई यांच्याकडे पोलीस स्थानकासाठी तसेच कुडचडे वीज कार्यालय, कुडचडे अग्निशामक दल कार्यालय, कुडचडे वाहतूक पोलीस आदींना सेनिटायजर व मास्क वितरित केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप मंडळाचे सचिव राजेंद्र वस्त, महिला मोर्चा अध्यक्षा रजनी नाईक, अशोक नाईक, आशिष करमली, नवीन खांडेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते, असे सावंत देसाई यांनी माहिती देताना सांगितले.