प्रतिनिधी / बेळगाव
वीज कोसळून शुक्रवारी दुपारी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. कणबर्गी रोडवरील सुरबी हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असून पावसामुळे झाडाखाली आडोशाला थांबलेल्या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
भरमाप्पा बहाद्दरवाडी (वय 35), प्रकाश व्यापारगी (वय 45) अशी त्या दुर्दैवी कामकारांची नावे असून सिव्हिल हॉस्पिटलला आणताना 4 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.