प्रतिनिधी / सातारा :
वीज बिल चोरी व थकित असणाऱ्या सातारा तालुक्यातील 6 उद्योजकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणाकडून राबविण्यात येणारी वीज बिल वसुली मोहीम तेजीत सूरू असल्याने उद्योजकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
नागेवाडी ता. सातारा येथे श्री साई स्टोन क्रशर कंपनीचे मालक प्रमोद नरसिंह साळवी यांनी औद्योगिक वीज वापरासाठी दिलेल्या वीज कनेक्शची एकून रक्कम 21 लाख 74 हजार 380 वीज बिल भरले नाही. तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. शांभवी स्टोन क्रशन कंपनीचे मालक वैभव आबासो सावंत, माणिकसिंग चतुरसिंग रजपुत, संतोष चतुरसिंग रजपुत, लिला चतुरसिंग रजपुत यांना औद्यागिक वीज वापरासाठी दिलेल्या वीज कनेक्शची एकून रक्कम 37 लाख 87 हजार 580 रूपये भरले नसून मीटरमध्ये फेरफार केलेला आहे. पल्लवी मनोज शेंडे यानीही 12 लाख 85 हजार 630 इतके वीज बिल भरले नाही. यामुळे या 6 उद्योजकांविरूद्ध महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता गणेश मारूती जाधव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.