आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते वितरण
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयातील देवलत्ती गावात गेल्यावषी 22 ऑक्टोबर रोजी अर्जुन इटगी यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न केले होते. सरकारकडून आलेल्या पाच लाख रुपये मदतीचा धनादेश आमदार निंबाळकर यांच्याहस्ते अर्जुन यांची पत्नी सुवर्णा यांना प्रदान करण्यात आला.
अर्जुन इटगी यांची घरची परिस्थिती प्रतिकूल आहे. त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून हेस्कॉमकडून पाठपुरावा करण्यात आला होता. यासाठी आमदार निंबाळकर यांचेही प्रयत्न विशेष कारणीभूत आहेत. घरचा कर्ता पुरुष हरपल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले होते. त्यामुळे या कुटुंबाला मदतीचा हात पुढे करण्यात आला. यावेळी खानापूर हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंता कल्पना तिरवीर, उपविभागीय अधिकारी पठाण आदी उपस्थित होते.