हेस्कॉमच्या अधिकाऱयांकडून दडपशाही होत असल्याची आरपीआयची तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
वीज बिल भरण्यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱयांकडून दडपशाही केली जात आहे. याचबरोबर बिल थकित असल्यास उद्धट उत्तरे देऊन अपमान केला जात आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. त्यामुळे बऱयाच जणांना बिल भरणे अशक्मय होत आहे. तेंव्हा हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी सामंजस्यपणाने ग्राहकांशी वागावे, अशी सूचना करा, अशी मागणी आरपीआयतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरोनामुळे सर्वच जनता अडचणीत आली आहे. त्यामुळे प्रलंबित बिले भरणे कठीण जात आहे. तरी देखील सर्वसामान्य जनता काही रक्कम देत आहे. ती रक्कम देताना ग्राहकांचा अपमान करण्यात येत आहे. तेंव्हा संबंधित बिल वसुली करणाऱया कर्मचाऱयांना सक्त ताकीद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.