प्रतिनिधी/ फलटण
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या फलटण विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांना एकोणचाळीस हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. सलग दुस्रया वर्षी महावितरणच्या मोठय़ा अधिकायास लाच घेताना अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत लाच लुचपत विभाग सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी फलटण येथील फलटण उपविभागीय कार्यालय येथील कार्यकारी अभियंता मंदार प्रकाश वग्याणी, वय 41 वर्षे, सध्या रा.- A-1, शासकीय निवास स्थान, लक्ष्मीनगर, एमएससिबी कॉलनी, फलटण मूळ रा.वर्धमान, सोनाक्लीनिक जवळ, आप्पासाहेब पाटीलनगर, आंबराईच्या मागे,सांगली यांनी तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे 13 लाख रुपयेची बिल मंजुरीसाठी पुढील कार्यालयास पाठवण्यासाठी बिलाचा रकमेच्या 3ज्ञ् रक्कम मागणी केली व त्यानुसार आज मंगळवार दि. 3 रोजी ठरलेली 39 हजार रुपये रक्कम कार्यकारी अभियंता मंदार प्रकाश वग्याणी यांच्या कक्षात विभागीय कार्यालय फलटण येथे तक्रारदार यांच्याकडून स्वीकारल्यानंतर मंदार वग्याणी यांना लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. मंदार वग्याणी यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
सदरची सापळा कारवाई पोलीस अधीक्षक ला.प्र.वि पुणे राजेश बनसोडे,सुरज गुरव व सुहास नाडगौडा
,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक अशोक शिर्के ,पो.ना.विनोद राजे, पो.कॉ.संभाजी काटकर, तुषार भोसले ,ला.प्र.वि सातारा यांनी केली.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी जर कोणाची लाच मागणी झाल्यास त्याबाबत तक्रार असल्यास पोलिस उप अधिक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , सि.स.नं 524 / अ , जिल्हाल कोषागार कार्यालयाजवळ , सदरबझार सातारा येथे अथव तसेच हेल्प लाईन क्रमांक 1064 वर तसेच व्हॉट्सअप नंबर 7875333333 नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन लाच लुचपत विभाग सातारा यांच्याकडून करण्यात आले आहे.