प्रतिनिधी/ महाड
तालुक्यांतील वीर गावाच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी रेल्वेस्थानकासमोर एका मोटारसायकलने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार तर एक जखमी झाला.
मुंबई-गोवा महामार्गावरील वीर गावाच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास वीर रेल्वेस्थानकासमोर मोटारसायकल (क्र. एमएच 06 बीटी-7726) वरुन पोलादपूर येथील गणेश तुळशीराम कासार व त्याचा सहकारी माणगावकडे जात होते. यावेळी महामार्गावर ट्रक (क्रमांक एचपी 12-एफ 9333) याला जोराने धडक दिली. या भीषण अपघातांमध्ये गणेश कासारे जागीच ठार झाले तर सूर्यकांत खेडेकर (रा. म्हसळा) हे गंभीर जखमी झाले. कासारे हे माणगाव एमआयडीसीमध्ये कामाला होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यांत आली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.