क्षुल्लक कारणावरून घडली घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
क्षुल्लक कारणावरून झालेल्या चाकुहल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी वीरभद्रनगर येथे ही घटना घडली असून रात्री मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
इक्बाल हैदरसाब शेख (वय 40) रा. शिवाजीनगर, अरबाज इस्माईल शेख (वय 15) रा. वीरभद्रनगर अशी जखमींची नावे असून रविवारी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. क्षुल्लक कारणावरून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची जबानी घेण्यात आली. आमीर खान व अन्य चौघा जणांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत होता.