प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील वीरशैव को-ऑप. बँकेच्या सन 2021 ते 2026 या काळासाठी संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झाली. गुरुवार अर्ज मागे घेण्याच्या अखरेच्या दिवशी 19 जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे, दत्त शिरोळ उद्योग समुहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडी पार पडल्या. सोमवार 25 रोजीच्या सर्वसाधारण सभेत याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातून 16, महिला गटातून 2, अनुसुचित जाती 1 असे एकूण 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले. संचालक पदांच्या 19 जागांसाठी 40 अर्ज दाखल होते. छाननी नंतर 7 अर्ज अवैध ठरलेने 33 अर्ज शिल्लक राहिले होते. बिनविरोधच्या चर्चानंतर यामधील 14 जणांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पाडली.
नूतन संचालक असे सर्वसाधारण गट
नानासी नष्टे, बाबासा देसाई, राजेश पाटील- चंदुरकर, गणपतराव पाटील, सूर्यकांत पाटील-बुध्दिहाळकर, डॉ. दिलीप चौगुले, महादेव साखरे, राजेंद्र शेटे, अनिल सोलापुरे, राजेंद्र लकडे, अनिल स्वामी, सदानंद हत्तरकी, चंद्रकांत सांगावकर, सतिश घाळी, वैभव सावर्डेकर, राजेंद्र माळी
महिला राखीव
शकुंतला बनछोडे, रंजना तवटे
अनुसुचित जाती -जमाती
चंद्रकांत स्वामी
संचालक मंडळाच्या कामाचे यश
पाच वर्षात संचालक मंडळाने काटकसरीचा कारभार केला. कोरोना काळातही बँपेने चांगली प्रगती साधली आहे. त्यामुळे बिनविरोध करुन सभासदांनी विश्वास टाकला आहे. सभासदांभिमूक कारभार करुन पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर बँक ओळख कायम ठेवू
गणपतराव पाटील, ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक