ऑनलाईन टीम / सातारा :
खंडाळा तालुक्यातील तोंडले याठिकाणी वीर धरण परिसरात दारु पार्टीत झिंगाट झालेल्या बारामती व खंडाळा तालुक्यातील या लोकांनी शासकीय परवान्याची मुदत संपलेल्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोनवेळा गोळीबार करत दहशत निर्माण केली.
याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी किरण देविदास निगडे (वय 46 रा.गुळूंचे ता.पुरंदर जि.पुणे), सूर्यकांत चंद्रकांत साळूंखे (वय 28,रा.कानिफनाथवस्ती,भादे ता.खंडाळा), नवनाथ बबन गाडे (वय 34रा.चोपडज,पोस्ट करंजे ता.बारामती जि.पुणे), माधव अरविंद जगताप (वय 32,रा.वाकी पोस्ट करंजे ता.बारामती जि.पुणे), तात्याराम अर्जून बनसोडे (वय 38,रा.अंथूर्णे ता.इंदापूर जि.पुणे), विजय ज्ञानदेव साळूंखे (वय 39,रा.चोपडज(सोमेश्वर) पोस्ट करंजे ता.बारामती जि.पुणे), योगेश प्रकाश रणवरे (वय 42, रा.राख ता.पुरंदर जि.पुणे), वसंत नामदेव पवार (वय 47,रा.कोळविहीरे ता.पुरंदर जि.पुणे), अरविंद घनशाम बोदेले (वय 41,सध्या रा.लवथळेश्वर ,जेजूरी ता.पुरंदर जि.पुणे मूळ रा.भिवापूर जि.नागपूर) यांना अटक केली आहे. यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा ,भारतीय शस्ञ अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वीर धरण परिसरात दारू पार्टीत झिंगाट झाल्याने किरण निगडे याने स्वमालकीच्या शासकीय परवान्याची मुदत संपलेल्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोनवेळा गोळीबार केला. त्यानंतर योगेश रणवरे याला रिव्हॉल्व्हर देत त्यानेही हवेत गोळीबार करीत वीर धरण परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. शिरवळ पोलिसांनी आरोपींकडून रिव्हॉल्व्हर, दोन कार, मोबाईल्स जप्त केले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.