कोरोनाची लागण झालेल्या लोकांपैकी एक तृतीयांश जण बरे झाल्याच्या 6 महिन्यापर्यंत लक्षणांना सामोरे जात राहिल्याचे चीनच्या एका अध्ययनातून समोर आले आहे. या लक्षणांमध्ये थकवा, अंगदुखी आणि निद्रानाश यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वुहानमध्ये कोरोनाची लागण होऊन गेलेल्या एक तृतीयांशपेक्षा अधिक लोक अद्याप रुग्णालयांच्या फेऱया मारत आहेत.
या अध्ययनासाठी 1700 हून अधिक जणांशी संवाद साधण्यात आला, ज्यात एक तृतीयांशपेक्षा अधिक संक्रमणमुक्त झाल्याच्या 6 महिन्यांनंतरही या लक्षणांना सामोरे जात आहेत. सर्वेक्षणात सामील 76 टक्के लोकांमध्ये एक तरी लक्षण कायम राहिले आहे. कोविडमधून बरे झाल्यावरही लोक कित्येक महिने दुष्परिणामांना तोंड देत आहेत. 63 टक्के लोकांनी किरकोळ कामानंतरही थकवा येत असल्याची तक्रार केली आहे. 26 टक्के जणांनी झोपेवर प्रभाव पडल्याचे म्हटले आहे. सर्वांना संक्रमणमुक्त होऊन 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.