3 वर्षांपासून सुखी संसार
एका महिलेने 2019 मध्ये एका वृक्षासोबत विवाह केला होता. यंदा ही महिला या वृक्षासोबत तिसऱयांदा नाताळ साजरा करणार आहे. एवढेच नाही तर या महिलेचे या वृक्षासोबत अत्यंत चांगला भावबंध निर्माण झाल्याने ती बहुतांश वेळ या वृक्षासोबत घालविणे पसंत करते. या महिलेचे नाव केट कनिंगहॅम असून ती इंग्लंडमध्ये राहते.
केटने या वृक्षासोबत विवाह केल्यावर स्वतःचे आडनाव देखील बदलले. तिने स्वतःचे आडनाव एल्डर केले आहे. केट दर आठवडय़ात या वृक्षाला भेटण्यासाठी 5 वेळा जात असते. या वृक्षासोबत वेळ घालविल्याने आमचे नाते मजबूत होत असल्याचे तिचे मानणे आहे. सध्या केट नाताळाची तयारी करत असून या वृक्षाला सजवत आहे, जेणेकरून आनंदाने या जोडीदार वृक्षासोबत वेळ घालविता येईल
एक बॉयप्रेंड देखील
केटचा एक बॉयप्रेंड देखील असून तो तिच्या आणि वृक्षाच्या या नात्याचा आदर करतो. तो अनेकदा त्यांच्यासोबत देखील असतो. केट अनेकदा स्वतःच्या पतीला (वृक्ष) आलिंगन देत असते. लॉकडाउन काळात तिने स्वतःच्या पतीसाठी मोठा वेळ काढला, ती अनेकदा या वृक्षाजवळ येऊन बसायची. ‘हा आमचा तिसरा नाताळ आहे, हा वृक्ष मला अत्यंत प्रभावित करत’ असल्याचे तिचे म्हणणे आहे.
महिला कार्यकर्त्यामुळे प्रभावित या वृक्षासोबत विवाह करण्यासाठी आपण मॉस्कोच्या एका महिलेमुळे प्रभावित झाले होते. त्या महिलेने स्वतःच्या भागातील तोडल्या जाणाऱया वृक्षासोबत विवाह केला होता. मॉस्कोतील महिला वृक्ष वाचविण्यासाठी काम करत लोकांना जागरुक करत होती. तर आपण देखील हा विवाह लोकांना जागरुक करण्याच्या उद्देशानेच केल्याचे केट सांगते.