प्रतिनिधी/ खेड
शहरातील बंदरनाका येथे वृक्ष कोसळल्याचा दूरध्वनी येथील पोलीस स्थानकात खणखणताच पोलीस अधिकाऱयांसह कर्मचारी तसेच आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी धावल्या. एकामागोमाग एक धावणाऱया यंत्रणामुळे नागरिकही सुरूवातीला बुचकळय़ात पडले. मात्र 3 जून रोजी होणाऱया चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणांचे प्रात्यक्षिक असल्याचे कळताच साऱयांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य कसे करतात, याची जाणीव नागरिकांना व्हावी तसेच यादरम्यान नागरिकांनी कसे सतर्क रहायला हवे याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे जनजागृती करण्यात येते. त्यानुसार मंगळवारी दुपारच्या सुमारास येथील पोलीस स्थानकात वृक्ष कोसळून आपत्ती घडल्याचा निनावी दूरध्वनी खणखणला. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी पोलीस कर्मचाऱयांना सतर्क केले. पोलिसांच्या पथकासह आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचल्या.
पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, गटविकास अधिकारी गुरूनाथ पारसे तसेच आरोग्य पथकही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमक बंबही घटनास्थळी पोहचला. नेमके काय घडले? याचा कोणालाच थांगपत्ता लागत नव्हता. तर्कवितर्कांना उधाण आलेले असतानाच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन प्रात्यक्षिक असल्याचे समजताच साऱयांचाच जीव भांडय़ात पडला.