बेळगाव / बेळगाव
साखरझोप हा अनुभव ज्यांच्यासाठी विरळा असतो, ते म्हणजे घरोघरी वृत्तपत्र पोहोचवणारे एजंट आणि विपेते. लॉकडाऊनच्या काळातही त्यांची सेवा अविरत सुरू आहे. त्यांच्या या सेवेची नोंद घेऊन या काळात त्यांनी सर्व तऱहेने सुरक्षित राहावे, या हेतूने ‘जितो मेन, जितो लेडिज विंग, जितो यूथ विंग’ यांच्यावतीने वृत्तपत्र एजंटांना मंगळवारी पहाटे सॅनिटायझर्स व हॅण्ड ग्लोज यांचे वितरण करण्यात आले.
जितो लेडिज विंगच्या अध्यक्षा भारती हरदी, जितो यूथचे राष्ट्रीय संचालक रजत हरदी यांनी मंगळवारी पहाटे तरुण भारत कार्यालयात येऊन एजंटांना आणि विपेत्यांना सॅनिटायझरचे वितरण केले. यावेळी बोलताना भारती हरदी म्हणाल्या, आपत्कालीन परिस्थितीतसुद्धा वृत्तपत्र विपेते, एजंट सदैव काम करत असतात. समाजातील सर्व घडामोडी त्यांच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचतात. त्यांच्या कामाची नोंद घेणे हे आमचे कर्तव्य आहे. सध्याच्या परिस्थितीतसुद्धा ते घरोघरी अंक पोहोचवित आहेत. त्यामुळे जितोचा खारीचा वाटा म्हणून त्यांना हे साहित्य आम्ही देत आहोत. तरुण भारत परिवारातर्फे यावेळी उपस्थित मनीषा सुभेदार यांनी जितोचे आभार मानले.