प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन काळात केशकर्तनची दुकाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना समस्या निर्माण झाली आहे. कोरोना परिस्थितीत घराच्या बाहेर जाऊन केशकर्तन करणे सध्याच्या काळात मुश्कील बनले आहे. त्यामुळे तरुण वर्ग घरीच एकमेकांच्या साहाय्याने केशकर्तन करीत आहेत. मात्र आश्रमातील वयोवृद्धांना ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे याची दाखल घेऊन प्रेंड्स फौंडेशन ग्रुपने आश्रय केंद्रातील वृद्धांचे केशकर्तन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे वृद्धांमधून समाधान व्यक्त होत आहे.