प्रतिनिधी/ बेळगाव
बसवेश्वर सर्कल, खासबाग येथील दुकानाच्या आडोश्याला राहून भर पावसात दिवस काढणाऱया एका वृद्धाला महाद्वार बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी सहारा मिळवून दिला. त्यांना नवीन कपडय़ासह त्यांचे कटींग करून शहापूर येथील सिद्धार्थ बोर्डींगमध्ये ठेवले. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
संजय पाटील यांनी तब्बल 110 वेळा रक्तदान करून त्यांनी सेवाभाव जपला. एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला आहे. शंकर रामचंद्र क्षिरसागर नामक 60 वषीय वृद्ध व्यक्ती गेल्या महिन्याभरापासून खासबाग येथील बसवेश्वर सर्कलजवळ राहत होती. पावसात कुडकुडत असताना त्या व्यक्तीकडे संजय पाटील त्यांचेकडे लक्ष गेले. त्यांची ती अवस्था पाहून तातडीने सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांच्याशी संपर्क साधला. विजय जाधव यांनी तातडीने युवा समितीतर्फे वितरित करण्यात येणारे ब्लॅंकेट त्यांनी उपलब्ध केले.
संजय पाटील एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या वृद्धाचे कटींग करण्यासाठी प्रयत्न केले. अनेक सलुन दुकानाच्या पायऱया झिजवल्या. मात्र बऱयाच जणांनी कोरोनामुळे कटींग व दाढी करण्यास नकार दिला. मात्र एका सलुन चालकाने त्या वृध्द्धाची कटींग व दाढी केली. त्यानंतर संजय पाटील यांनी त्या वृद्धास अंघोळ घातली.
सामाजिक कार्यकर्ते परशराम अनगोळकर यांच्याकडून शर्टपॅन्ट मागवून घेऊन त्या वृद्धास परिधान करण्यास दिले. ही सोय झाली तरी त्या वृद्धाला राहण्याची आणि खाण्याचा प्रश्न निर्माण झाला. तातडीने वृद्धाला नाथ पै सर्कल येथील इंदिरा कॅन्टीनमध्ये नेऊन पोटभर जेवू घातले. याचबरोबर महिनाभर लागणाऱया जेवण नाष्टय़ाची सोयदेखील त्यांनी केली. गुरुवारी परशुरामभाऊ नंदिहळ्ळी संचलित सिद्धार्थ बोर्डींग या आश्रमात जाऊन नंदिहळ्ळी यांना त्या वृद्धाला ठेवून घेण्याची विनंती केली. त्यांनी होकार दिला व त्या आश्रमात ठेवून घेतले. या वृद्धाला एक आसरा दिला. याबद्दल संजय पाटील यांचे कौतुक होत आहे. यासाठी युवा समितीचे विजय जाधव, किरण हुद्दार आणि सामाजिक कार्यकर्ते परशराम अनगोळकर यांचे सहकार्य लाभले आहे..