बेळगाव : बसवंत महादेव पाटील या 74 वर्षीय गृहस्थांना सापडलेला धनादेश त्यांनी तरुण भारत कार्यालयात आणून दिला आहे. ते सुळगा-हिंडलगा येथे राहत असून, सोमवारी सकाळी गणपती मंदिरापाशी त्यांना हा धनादेश मिळाला.
सदर धनादेश बेळगाव जिल्हा राणी चन्नम्मा महिला सहकारी बँकेचा असून, तो दिशा इन्फोटेकसाठी देण्यात आला आहे. बसवंत यांनी प्रामाणिकपणे हा धनादेश तरुण भारतकडे आणून दिला असून, तो संबंधितांना देण्याची विनंती केली आहे. या प्रामाणिकपणाबद्दल बसवंत महादेव पाटील यांचे कौतुक होत आहे.