अनोळखी तीन महिलाविरूद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
पोवईनाका ते अदालत वाडा या मार्गाने रिक्षातून जात असताना वृद्ध महिलेला याच रिक्षातील 3 अनोळखी महिलांनी बोलण्यात गुंतवून त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले 30 हजार रूपये चोरले. यांची माहिती वृद्ध महिलेला कळताच त्यानी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सातारा एसटी स्टॅड वर एका वृद्ध महिलेने दुसऱया वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून अंगावरील सोने पिश्वीत काढून ठेवण्यात सांगितले. उसाचा रस पिण्याच्या बहाण्याने हे सोने चोरून नेले. अशीच घटना गुरूवारी घडली. पोवईनाका येथील राजपुरोहित स्वीटमार्ट दुकानाच्या समोर असणाऱया रिक्षातून लिलावती लक्ष्मण गायकवाड(वय 65, रा. आसनगाव ता. सातारा) ते अदालत वाडय़ाच्या अलीकडे पिसाळ आर्केट सातारा येथे राहत असलेल्या भाचीला भेटायला निघाल्या होत्या. यावेळी रिक्षात आणखी तीन महिला बसल्या होत्या. या महिलांनी लिलावती यांची ओळख काढून बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील बॅगेत हात घालून पांढऱया रंगाच्या कापडी पिशवीत ठेवलेले 30 हजार रूपये चोरले. या चोरीची माहिती लिलावती यांना भाचीच्या घरी गेल्यावर लक्षात आले. यानंतर त्यांचा गोंधळ उडाला. घाबरेलल्या लिलावतींनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात जावून अज्ञात 3 महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे वृद्धांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवासादरम्यान, काळजी घेत पटकन विश्वास न ठेवता, अडचण वाटल्यास तात्काळ पोलीसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे. या गुह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.