केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या हस्ते झाले लोकार्पण
वार्ताहर / वेंगुर्ले
केंद्रीयमंत्री झाल्यानंतर नारायण राणेंच्या हस्ते प्रथमच वेंगुर्ले नगरपरीषदेच्या सागररत्न मच्छिमार्केटचे उदघाटन आँनलाईन पध्दतीने झाले होते तदनंतर रविवारी जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून वेंगुर्लेच्या प्रत्यक्ष भेटीस आल्यावर अख्या महाराष्ट्रात ख्याती असलेल्या व सर्व प्रकारचे साहित्य एकाच जागी मिळणाऱ्या अशा नुतनीकरणाने सुसज्ज केलेल्या क्रॉफर्ड मार्केटचा लोकार्पण सोहळा केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते संपन्न झाला.जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून वेंगुर्ले नगरात आलेल्या केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणें यांचे वेंगुर्ले नगरपरीषदेत आगमन झाल्यानंतर वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी नगरसेवकांसमवेत पुष्पहाराने स्वागत केले. त्यानंतर नुतनीकरणाने सज्ज झालेल्या 46 गाळे हे जे व्यापारी त्या ठिकाणी व्यवसाय करीत होते त्यांना शासनाच्या नियमानुसार भाडय़ाने देण्यात आलेले आहेत. या नुतनीकरणाने सज्ज झालेल्या क्रॉफर्ड मार्केटमधील व्यापारी गाळ्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थितात निलम राणे, राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृपा गिरप-मोंडकर, पुनम जाधव, शितल आंगचेकर आदींचा समावेश होता.
वेंगुर्ले शहरांत उदघाटनास सज्ज विकास कामांची नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना माहिती
वेंगुर्ले शहर हे विविध विकास कामांनी विकासाच्या मार्गावर असून लोकपयोगी, पर्यटनदृष्टय़ा साकारलेल्या अशी 10 कामे पूर्णत्वास आलेली आहेत. यात नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, लोकमान्य टिळक वाणिज्य संकुल, पवनपुत्र भाजी मंडई, घोडेबांव उद्यान, मंगेश पाडगांवकर बालोद्यान, मानसीश्वर उद्यान, सागर बंगला ते दिपगृहापर्यत जाणारा पदपथ मार्ग, शहराच्या तीन ठिकाणी तयार करण्यांत आलेल्या स्वागत कमानी, नगरपरीषदेच्या इमारतीवर बसविण्यांत आलेली सोलर सिस्टीम, व शहरातील नागरीकांना मार्गदर्शक सुचना व जाहिरातदारांना जाहिराती करण्यासाठी बसविण्यांत आलेल्या चार एल. ई. डी. क्रिान या कामांची माहिती यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना दिली.