वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली, उभादांडा व खानोली ग्रामपपंचायतीच्या सर्वसाधारण प्रवर्गातील प्रत्येकी एका जागेसाठी मंगळवारी झालेल्या पोटनिवडणुकीत दाभोली ग्रामपंचायत मधून एकनाथ रामचंद्र राऊळ, उभादांडा ग्रामपंचायत मधून गणपत उपमन्यु सावंत तर खानोली ग्रामपंचायत मधून रघुनाथ लक्ष्मण खानोलकर हे विजयी झाले आहेत.
येथील तहसिलदार कार्यालयात पोटनिवडणुकिती मतदानाची मतमोजणी निवासी नायब तहसिलदार नागेश शिंदे यांच्या मार्गदशनाखाली दाभोली ग्रामपंचायतीचे निवडणुक अधिकारी विजय घोंगे, उभादांडा ग्रामपंचायतीचे निवडणुक अधिकारी संजय चव्हाण तर खानोली ग्रामपंचायतीच निवडणूक अधिकारी प्रितम पवार यांनी मतदोजणीचे काम चोख पाहिले.
यावेळी उभादांडा येथे एका जागेसाठी कमलाकर पांडूरंग कुबल यांना 196 तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणपत उपमन्यु सावंत यांना 264 व नोटा मते-5 अशा एकूण 465 मतांची मोजणी पूर्ण झाली. यात गणपत उपमन्यू सावंत हे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी संजय चव्हाण यांनी जाहिर केले, खानोलीत एका जागेसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या रुपाली किरण प्रभू-खानोलकर- 66 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी रधुनाथ लक्ष्मण खानोलकर यांना-99 व नोटा मते-1 अशो 166 मतांची मोजणी झाली. यात रघुनाथ लक्ष्मण खानेलकर हे विजय झाल्याचे निवडणुक अधिकारी प्रितम पवार यांनी जाहिर केले. दाभोलीत एका जागेसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या एकनाथ रामचंद्र राऊळ यांना 179 तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजाराम यशवंत कांबळी यांना 142 व नोटा मते 4 अशा एकूण 325 मतांची मोजणी झाली. यात एकनाथ रामचंद्र राऊळ हे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी विजय घोगे यांनी जाहिर केले.