प्रवाश्यांना लाभ घेण्याचे आवाहन
वेंगुर्ले / वार्ताहर:
वेंगुर्ले आगारातून सध्या चालू करण्यात आलेल्या एस. टी. बस गाडय़ात पुढील प्रमाणे आहेत. या एस. टी. बससेवेचा लाभ प्रवाशी वर्गाने घ्यावा असे आवाहन बसस्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.सध्या चालू करण्यांत आलेल्या एस.टी. बस गाडय़ांत सकाळी 5 वाजता वेंगुर्ले आजरामार्गे कोल्हापूर, सकाळी 6.30 वाजता वेंगुर्ले मठमार्गे रत्नागिरी, सकाळी 7 वाजता वेंगुर्ले मठमार्गे अक्कलकोट, सकाळी 8 वाजता वेंगुर्ले बावडामार्गे पुणे (शिवनेरीबस), सकाळी 8.30 वाजता वेंगुर्ले आजरामार्गे पुणे, सकाळी 11.30 वाजता वेंगुर्ले दाभोलीमार्गे सांगली, दुपारी 1.15 वाजता वेंगुर्ले बावडामार्गे कोल्हापूर, दुपारी 2 वाजता वेंगुर्ले बावडामार्गे कोल्हापूर, सकाळी 6 वाजता वेंगुर्ले दाभोलीमार्गे देवगड, सकाळी 6.30 वाजता वेंगुर्ले-सातार्डा, सकाळी 8 वाजता वेंगुर्ले दाभोलीमार्गे कुडाळ, सकाळी 8 वाजता वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी, सकाळी 8.15 वाजता वेंगुर्ले-सिंधुदुर्गनगरी, सकाळी 9 वाजता वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी, दुपारी 12 वाजता वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी, दुपारी 12.30 वाजता वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी, दुपारी 3.30 वाजता वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी, सायंकाळी 5 वाजता वेंगुर्ले मठमार्गे कुडाळ, सायंकाळी 5 वाजता वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी, सायंकाळी 6.20 वाजता वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी, सकाळी 7 वाजता केरवाडा देवलीमार्गे मालवण, सायंकाळी 6.10 वाजता मालवण देवलीमार्गे केरवाडा, सकाळी 10 वाजता वेंगुर्ले देवलीमार्गे मालवण, दुपारी 4 वाजता वेंगुर्ले देवलीमार्गे मालवण, कुडाळ डेपोच्या वेंगुर्लेतून सकाळी 10 वाजता वेंगुर्ले मठमार्गे कुडाळ, दुपारी 3.45 वाजता वेंगुर्ले-कुडाळ यांचा समावेश आहे.याशिवाय प्रवाश्यांच्या आलेल्या मागणी व भारमानानुसार कांही बसगाडय़ा सुरू करण्यांत येणार आहेत.वेंगुर्ले आगारातून प्रवाश्यांच्या सेवेककरीता सुरू करण्यांत आलेल्या या एस. टी. प्रवाशी बससेवेचा लाभ प्रवाश्यांनी घ्यावा. असे आवाहन वेंगुर्ले बसस्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.