मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात सन्मान सोहळा
वेंगुर्ले/ प्रतिनिधी-
गुर्ले तालुका शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तोकते चक्रीवादळात उत्तम सेवा बजावणाऱ्या विज वितरणच्या कामगारांचा, तसेच कोरोना कालावधीत चांगली सेवा बजावणारे 108 चे वाहान चालक, कोरोना योद्धा अशा एकुण 120 जणांचा शाल, श्रीफळ, सनमान पत्र, रोप,व रेनकोट देवून शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उप जिल्हा प्रमुख सुनिल डुबळे, बाळा दळवी, सचिन देसाई, तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उप नगराध्यक्षा असमिता राऊळ, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, मंजुश्री आरोलकर, श्वेता हुले, विवेक आरोलकर, सचिन वालावलकर, पंकज शिरसाट, आदी उपस्थित होते. यावेळी 120 जणांचा सत्कार संजय पडते व ईतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.