वेंगुर्ले/प्रतिनिधी-
रा. कु. पाटकर हायस्कूल आणि रा. सी. रेगे जुनियर काँलेज वेंगुर्ले येथेसोमवार 9 आँगष्ट रोजी क्रांती दीन साजरा करण्यात आला.
यानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य लड्यात होताम्य पतकरलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृती ना वंदन करण्यासाठी पणत्या लावून मानवंदना देण्यात आली. यावेळी आध्यक्रातीकारक वासुदेव बळवंत फडके, मदनलाल, बाबू गेनू, मंगल पांडे, चाफेकर बंधू, भगतसिंग, सुखदेव, उषा मेहता, अरुणा असफ अली यांच्या विषयी गोसावी, बोवलेकर, खरात, कामत, मांजरेकर, यांनी विचार मांडले. यावेळी मुख्याध्यापक पी. एस. जाधव, जिमखाना प्रमुख एस. जी. येरम, सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश बोवलेकर, उपस्थित होते. कार्यक्रम चे सुत्रसंचलन बोवलेकर यांनी तर आभार पी. एस. पोटफोडे यांनी मानले.