वेंगुर्ला/ प्रतिनिधी –
वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अतुल मुळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. सातारा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना आला हृदयविकाराचा झटका आला . आज सायंकाळीच ते सातारा येथून वेंगुर्लेला यायला निघणार होते पण निघण्यापूर्वीच घरी त्यांच्यावर काळाने घाला घातला. तासाभरापूर्वीच त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,मुलगा ,आई, भाऊ असा परिवार आहे .डॉक्टर मुळे हे गेली अनेक वर्ष वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सेवा देत होते. सर्पदंशावर यशस्वी उपचार करणारे डॉक्टर म्हणून ते ओळखले जायचे. आतापर्यंत त्यांनी सर्पदंशाच्या शेकडो पेशंटना मृत्यूच्या दाढेतून सुखरूपपणे बाहेर काढले. डॉक्टर मुळे यांच्या या आकस्मिक निधनाने संपूर्ण वेंगुर्ले तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे .