पदग्रहण सोहळा 7 ऑगस्टला : ऑनलाईन पध्दतीने होणार:
वार्ताहर / वेंगुर्ले:
वेंगुर्ले रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा शनिवार दि 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला आहे. रोटरी क्लब वेंगुर्ले प्रेसिडेंटपदी सदाशिव भेंडवडे, सेपेटरीपदी सुरेंद्र चव्हाण, खजिनदारपदी नितीन कुलकर्णी याची एकमताने निवड झाली आहे.
डिस्ट्रिक्ट 3170 चे नॉमीनेटेड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते नूतन कार्यकरिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ व शशिकांत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
रोटरी क्लब वेंगुर्लेच्या या पदग्रहण सोहळय़ास सर्वानी ऑनलाईन उपस्थित रहावे. असे आवाहन वेंगुर्ला रोटरीचे मावळते अध्यक्ष गणेश अंधारी व वसंतराव पाटोळे यांनी केले आहे.