प्रतिनिधी / वेंगुर्ले:
कोकण हापूस आंबा उत्पादक व विपेते संस्था, कृषी पणन मंडळातर्फे शुक्रवारी 24 जानेवारीला सकाळी 10 वाजता फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे जीआय मानांकन नोंदणीसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जीआय मानांकन हे भविष्यात आंबा विक्रीसाठी ‘हापूस’ हे नाव वापरण्यासाठी सक्तीचे होणार आहे. त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. तसेच जिल्हा बँक ही जीआय नोंदणीकृत शेतकऱयांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे व मुकुंदराव जोशी (रत्नागिरी) उपस्थित राहणार आहेत. इच्छुक आंबा बागायतदार विपेत्यांनी सातबारा, 8-अ, पॅनकार्ड, दोन फोटो, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर, कराराच्या बागा असल्यास सदर मालकाचा सातबारा आणवा. अधिक माहितीसाठी सचिन गावडे (7066851608), सागर गडेकर यांच्याशी संपर्क साधावा.