बर्गर कंपनीने तयार केली अनोखी डिश
जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला मांसाहाराची चव माहित नसेल तर सध्या वेगनच्या अशा अनेक डिशेज उपलब्ध झाल्या आहेत, ज्यांची चव एकदम मांसाहारी पदार्थांसारखी असते. एका स्वीडिशन कंपनीने वेगन डिशमध्ये अनोखी चव तयार करत लोकांना चकित केले आहे. या कंपनीने तयार केलेला वेगन बर्गर चवीला एकदम नॉन-व्हेजप्रमाणे आहे. या स्वीडिश फूड कंपनीचे नाव ओम्फ असून जागतिक पातळीवर याच्या युनिक फूड क्रिएशनसाठी मान्यता प्राप्त आहे.
या कंपनीला स्वतःच्या क्रिएटिव्हिटीसाठी ओळखले जाते. मागील आठवडय़ात कंपनीला जागतिक पुरस्कारही मिळाले आहेत. एक रोपआधारित बर्गर तयार करणे नॉन-व्हेजसारखेच होते. हा प्रकार अत्यंत रोमांचक असण्यासह भीती निर्माण करणाराही होता असे उद्गार कंपनीचे सह-संस्थापक अन् कॉर्पोरेट शेफ एंडर्स लिंडेन यांनी काढले आहेत.
आम्ही हा बर्गर काही काळातच विकसित केला आहे. ही आमची अजब पद्धत आहे. परंतु केवळ रोपाचा वापर करून कुठल्याही प्रकारचे भोजन तयार करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. रोपआधारित परंतु दिसण्यास नॉन-व्हेज वाटणारा बर्गर कंपनीने मागील वर्षी सादर केला होता.