अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 13 जून 2021, सकाळी 11.30
● शनिवारी रात्री 856 जण बाधित ● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.16 ● 7,843 जणांचे नमुने तपासले ● जिल्ह्यात 2,872 बेड शिल्लक ● मृत्यू दरात घट झाल्याचा दिलासा ● साताराची वाटचाल मुंबईच्या बरोबरीने
सातारा / प्रतिनिधी :
एप्रिल-मे महिन्यात पेंडिंग अहवालांची भरण्यात येत असलेली आकडेवारी त्यामुळे जिल्हा भयकंपित झाला होता. दोन हजारांच्या पटीत बाधित वाढ सुरू होती. गेल्या आठ दिवसापासून 2000 बाधित वाढीचा रतीब बंद झाला असून, आता तो 800 च्या पटीत सुरू आहे. शनिवारी रात्रीच्या अहवालात देखील 856 जणांचा अहवाल बाधित आला असून जिल्ह्याचं पॉझिटिव्हिटी दर 9.16 एवढा आहे. एकीकडे मुंबईमध्ये सातारा जिल्ह्याच्या एकूण संख्या एवढे रुग्ण समोर येत आहेत तर सातारा-मुंबईच्या बरोबरीने चाललेला आहे. कारण कालचा मुंबईचा आकडा फक्त 743 एवढा होता. साताऱ्यात मात्र कहर सुरूच आहे.
वाढ कमी करण्याची जबाबदारी सर्वांचीच
दरम्यान जिल्ह्यात आजमितीस एकूण संख्येपैकी 2,872 एवढे बेड शिल्लक असल्याचा दिलासा असला तरी बाधित वाढ थांबत नाही तोपर्यंत जिल्ह्याची सुटका नाही. सध्यातरी बेडसाठी हाल होत नाहीत, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. मागच्या महिन्यात आकडेवारीचा झालेला घोळ अद्यापी नागरिक विसरलेले नाहीत. आत्तासुद्धा ज्या पद्धतीने बाधित वाढ समोर येत आहे ती पाहता कमी करण्याची जबाबदारी प्रशासनावर सुद्धा आहे आणि नागरिकांच्या वर सुद्धा आहे. बाधित वाढ कमी झाली की प्रशासनाचे प्रयत्न आणि वाढली की नागरिकांचा बेजबाबदारपणा हे देखील बंद व्हायला हवे.
सलग आठ दिवस वाढ तीन अंकावर
सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग अद्याप हजारांच्या पटीत शिल्लक आहे. बाधित वाढीने दोन हजारांचा रतीब बंद करून आता एक हजार संख्येचा रतीब सुरू केला आहे. मात्र गेली आठ दिवस तो तीन अंकांवर स्थिरावला असून दररोज आठशेच्या पटीत सुरूच आहे. मात्र वेग मंदावला याचा दिलासा मिळत आहे. लॉकडाऊन थोडा तरी शिथिल केल्याने थोडासा सुटकेचा निश्वास टाकला आहे. तर काल बळींचे आकडे कमी होते मात्र ते थांबले नाहीत याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.19
शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार7,843 जणांचे नमुने तपासण्यात आल्यानंतर 856 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.16 नमूद करण्यात आलेला आहे. गेली आठ दिवस सलगपणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर देखील दहा, नऊ टक्क्यांच्या आसपास राहिलेला आहे. त्यामुळे निश्चितच 15 तारखे नंतर सातारा जिल्हाला लॉकडाऊन मधून चांगली शिथीलता मिळू शकते.
जिल्हय़ात 2,872 बेड रिक्त
आजमितीस जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,860 एकूण बेड संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,088 एवढी असून हॉस्पिटलमध्ये 2,334 बेड रिक्त आहेत. कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 56 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 190, ऑक्सिजनसह 1,764 बेड आणि ऑक्सिजनविना 582 असे 2,872 बेड रिक्त आहेत.
शनिवारी जिल्ह्यात बाधित -833मृत-28मुक्त-846
शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण बाधित – 1,79,751,एकूण कोरोनामुक्त – 1,65,207,मृत्यू -4,032, उपचारार्थ रुग्ण-10,590