न्यूयॉर्कच्या वेनेसाने मांडले उदाहरण, घरगुती हिंसाचार पीडितांबद्दल जागरुकतेचा प्रयत्न
47 वर्षीय वेनेसा रेसरने वेडिंग ड्रेस परिधान करून रस्त्यांवर धावण्यास प्रारंभ केल्यारव लोक तिला पाहून अवाप् झाले. या सायकोथेरेपिस्टने दोन आठवडय़ांमध्ये 285 किमीचे अंतर धावून कापले आहेत. तिने एक आठवडय़ापर्यंत प्रतिदिन सुमारे 24 किलोमीटरची दौड केली आहे. या दौडीमागे वेनेसाचा विशेष हेतू होता. घरगुती हिंसाचाराने ग्रस्त लोकांची मदत करणे आणि याबद्दल जागरुकता फैलावण्यासाठी तिने हे काम केले आहे. न्यूयॉर्कच्या रॉकलँड येथे राहणाऱया वेनेसाने हा अनुभव मजेशीर होता असे म्हटले आहे.
मी स्वतः देखील घरगुती हिंसाचाराची पीडिता राहिली आहे. या समस्येला तोंड देणारे अनेक लोक माझ्याकडे येत असतात असे ती सांगते. वेनेसाने घरगुती हिंसाचार विरोधात आवाज उठविण्यासाठी स्वतःचा वेडिंग ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसला हेमलाइनने ट्रिम करवत ती सहजपणे धावू शकली आहे.
वेनेसाच्या या कामाचे कौतुक करताना ओसवेगो येथून मॅनहॅटनपर्यंत धावताना तेथील हॉटेल्सने तिला आणि तिच्या सहाय्यकांना मोफत सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. स्वतःचा हा प्रयत्न सुरू ठेवत अन्य राज्यांमधूनही हिंसाचार पीडित लोकांच्या मदतीसाठी निधी जमा करता येईल अशी अपेक्षा तिला आहे.