क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
वेणुग्राम सायकलींग क्लबच्या सायकलपटूंनी विविध मालिकेच्या सायकलिंग स्पर्धेतून 11 सायकलपटूंनी विविध फेऱयांत 4000 किमी अंतर 36 दिवसात पूर्ण करून नवीन विक्रम नोंदविला.
200 किमी बेळगाव-हुबळी एअरपोर्ट-बेळगाव, 300 किमी हुबळी-शिकारपूर-हुबळी, 400 किमी बेळगाव-कराड-काशील-बेळगाव, 600 किमी तिनईघाट- कराड-हुबळी-तिनईघाट या विविध सायकलिंगच्या फेऱया 36 दिवसात नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 या वेळेत पूर्ण केल्या आहेत. या 11 रायडर्सनी केलेला हा विक्रम आहे. रोहन हरगुडे, इंद्रजीत हलगेकर, जसमिंदरसिंग खुराना, धीरज भाटी, चाणक्मय बुद्धप्पण्णावर, अरविंद कडानगले, विवेक गुलबानी, अरूण पाटील, अमन नदाफ, राधेकृष्णा नायडू, सतिश बागेवाडी या शूर सायकलपटूंनी वरील विविध सायकल फेरींचे टप्पे ओलांडून एक नवीन विक्रम नोंदविला आहे. वरील सर्व सायकलपटू वेणुग्राम सायकलिंग क्लबचे खेळाडू असून या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.