जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राबवला उपक्रम
वार्ताहर / वेतवडे
पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या तीन मुली व सातवीतील 3 मुलांनी 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेतवडे ते मल्हारपेठ असे 11 किलोमीटर अंतर धावत जात महिला सबलीकरण, त्यांचे आरोग्य व स्री-पुरुष समानता याविषयी संदेश दिला.
वाटेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे मल्हारपेठ, वाघुर्डे, सुळे व कोदवडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा देत कौतुक व सत्कार केला. या उपक्रमात इयत्ता चौथीतील श्रेया संजय सोनार, संचिता भिकाजी पाटील, गौरी आनंदा पाटील व सातवीतील समर्थ रामदास पाटील, तन्मय संजय पाटील , सुरज शंकर पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळेत आल्यानंतर या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्याध्यापक प्रकाश वातकर, वर्गशिक्षक जयवंत चौगुले, दिलीप पाटील , ऊर्मिला तेली, स्वप्नाली कलकुटकी, माणिक शिंदे , सरपंच सुनिता दळवी तसेच ग्रामस्थ संजय सोनार ,शंकर पाटील यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.