सावंतवाडी/ प्रतिनिधी-
मुंबई- गोवा महामार्गावरील झाराप- पत्रादेवीच्या वेत्ये- तिठा येथे गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात वयोवृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाले.
गुरुनाथ राजाराम प्रभू- झांट्ये (वय ८५, रा. आजगांव) असे सदर वृद्धाचे नाव आहे. ही घटना दुपारी १ च्या सुमारास घडली. वेत्येतील माजी उपसरपंच नरेंद्र मिठबावकर आणि तेथील स्थानिकांनी धाव घेत मदत केली. घटनास्थळी पोलिस दाखल होऊन त्यांनी पंचनामा सुरू केला आहे.