प्रतिनिधी/ सातारा
आमदार शिवेंद्रराजेंचा वाढदिवसानिमित्ताने गोडोली येथे कर्तव्य सोशल ग्रुप गोळीबार मैदान गोडोली मित्रसमुह यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास स्वतः वेदांतिकराजे यांनी रक्तदान करुन प्रारंभ करण्यात आला. या शिबिरामध्ये अनेक महिलांनी व तृतीयपंथीयांनीही रक्तदान केले. रवी पवार यांनी तब्बल 43 वेळा रक्तदान केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
गोडोली येथील सभागृहात आमदार शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित रत्कदान शिबिरावेळी वेदांतिकाराजे भोसले, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, सुवर्णादेवी पाटील, शरद काटकर, व्यकंटराव मोरे, रवी पवार, फिरोज पठाण, माजी पंचायत समितीच्या सदस्या वनिता कण्हेरकर, आशुतोष चव्हाण, प्रकाश घाडगे, सुनील मोरे-पाटील, अविनाश माने, गणेश निकम, आबा जगताप, पूनम निमक, उषा जाधव, सोनल माने, सुवर्णा कणसे, रुपाली घाडगे, रवी आहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना वेदांतिकाराजे म्हणाल्या, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानाचे महत्व आपण कोरोना काळात पाहिले आहे. रवी यांचे कार्य आपण पहातोच आहे. त्यांनी अनेकांच्या मदतीला धावून जात मदत केली आहे. समाज कार्य करत असताना समाजातील ज्या घटकाला मदत हवी आहे. त्या घटकास मदत देण्याकरता स्वतः रवी पवार हे प्रयत्न करत असतात. कोणाला रक्ताची गरज असेल तर ते स्वतः जावुन रक्तदान करतात. त्यांच्या या रक्तदान उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अशा कार्यकर्त्यांचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा, अशा शब्दात त्यांनी कौतुक करत रवी पवार यांचा सत्कार करण्यात आला.
स्वतः वेदांतिकाराजे यांनी केले रक्तदान
महिला असले म्हणून काय झाले. रक्तदान महिलाही करतात आणि स्वतः वेदांतिकाराजे यांनी स्वतः रक्तदान करुन या रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. अनेक महिलांनी स्वतही रक्तदान केले.