बेंगळूर
मान्यवर आणि मोहे यासारख्या पेहरावातील ब्रँडचे सादरीकरण करणाऱया वेदांत फॅशन्स लिमिटेडचा आयपीओ 4 फेब्रुवारी रोजी खुला होणार आहे. नियामक सेबीकडून कंपनीला आयपीओ सादरीकरणासाठी रितसर परवानगी मिळाली आहे. वेदांत फॅशन्स लिमिटेडचा आयपीओ 4 फेब्रुवारीला खुला होणार असून 8 फेब्रुवारीला बंद होणार आहे. समभागाचा भाव 824 रुपये ते 866 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.