प्रतिनिधी/ बेळगाव
खडेबाजार पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल शंकर शिंदे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा वेदांत फौंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. वेदांत फौंडेशनचे गौरवाध्यक्ष प्रा. डी. एन. मिसाळे यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. .
यावेळी पीएसआय सौदागर, वेदांत फौंडेशनचे अध्यक्ष सतिश पाटील, उपाध्यक्ष एन. डी. मादार, सेपेटरी सुनिल देसूरकर, ठळकवाडी हायस्कूलचे सी. वाय. पाटील, युवराज रत्नाकर, उमेश बाळेकुंद्री, मंगल शेटवान, मारूती तमुचे, विलास पाटील, के. बी. पाटील, आस्मा नाईक, सुजाता लोखंडे, लता लकडे, सरिता पाटील, मनिषा एस. यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.