कोरोनाशी लढण्यास कंपनी अभियान राबविणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खाण क्षेत्रात कार्यरत असणारी देशातील दिग्गज कंपनी वेदान्ताने कोरोनाशी लढा देण्यासाठी व त्याचा होणारा संसर्ग रोखण्यासाठी सरकारला भरघोस योगदान दिले आहे. या अगोदर कंपनीने 101 कोटीची मदत जाहिर केली होती. परंतु त्यामध्ये आता पुन्हा 100 कोटीची भर टाकत पंतप्रधान सहाय्यता निधीत एकूण 201 कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
वेदाता मुख्य निधीमधून तीन क्षेत्राना मदत करणार आहे. रोजदारीवर काम करणाऱया लोकांच्या आरोग्याची देखभाल करणे, सर्व प्रकल्पावर काम करणाऱया कर्मचाऱयांना एकत्रित मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आगामी तीन महिन्यासाठी प्रवास करुन कामावर येणाऱया कामगारांना प्रवास खर्च द्यावा. आणि रस्त्याच्याकडेला ट्रक चालकांसाठी खाण्यापिण्यासाठी हॉटेल सुरु करावेत. व देशातील कोणीही उपाशी राहून दगावू नये म्हणून ही सर्व जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे.