वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशामधील अब्जाधिश व्यावसायिक अनिल अग्रवाल शेअर बाजारामधील आपली लिस्टेट कंपनी वेदान्ताला खासगी कंपनी बनविण्याच्या तयारी करत आहेत. त्यांनी या संदर्भात मंगळवारी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की भारतामधील नोंदणीकृत कंपनी असणाऱया वेदान्ताचे सर्व सार्वजनिक समभाग पुन्हा खरेदी करुन आपली खासगी कंपनी बनविण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अग्रवाल यांच्या नियंत्रणातील वेदान्ता रिसोर्सिज समूहातील कंपनी वेदान्ता लिमिटेड आपला जवळपास 49 टक्के सार्वजनिक समभागधारकांकडून समभाग खरेदी करण्यासाठी 16,200 कोटी रुपयांमध्ये 87.5 रुपये याप्रमाणे प्रति समभाग खरेदी होण्याचे संकेत आहेत. कंपनीच्या समभागांचे मूल्य मंगळवारी मुंबई शेअर बाजारात 89.30 रुपयावर बंद झाले तर वेदान्ताने नियामक मंडळाला दिलेल्या माहितीमध्ये कंपनीचे प्रवर्तक समूह वेदान्ता स्रोतासोबत एकटय़ाने किंवा कोणाच्यातरी मदतीने कंपनीचे सर्व अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.