नवी दिल्ली
वेदान्त फॅशनचे समभाग 866 रुपये प्रति समभाग मूल्याच्या तुलनेत शेअर बाजारात आठ टक्क्यांच्या तेजीसोबत सुचीबद्ध झाले आहेत. यामध्ये बीएसईवर समभाग 936 रुपये किमतीवर लिस्ट झाला असून एनएसईवर 7.96 टक्क्यांसोबत 935 रुपयावर लिस्ट झाला आहे. त्यामुळे वेदान्त फॅशन्सचे समभाग घेतलेल्या गुंतवणूकदारांना प्रती समभाग 70 रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीच्या आयपीओला 2.57 पट प्रतिसाद मिळाला
होता.