प्रतिनिधी / पणजी
साहित्याच्या विकासासाठी कार्यरत देशातील सर्वोच्य संस्था असलेल्या केंद्रीय साहित्य अकादमीने 2021 वर्षाचे कोंकणी भाषेसाठी असलेले आपले पुरस्कार जाहिर केलेले आहेत.
या पुरस्कारांमधील, साहित्यासाठी असलेला पुरस्कार सुप्रसिध्द कोंकणी कवी आणि कोंकणी अकादमीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजीव वेरेंकार यांच्या ‘रक्तचंदन‘ या कविता संग्रहाला प्राप्त झाला आहे.
बाल साहित्याचा पुरस्कार ज्ये÷ लेखिका सुमेधा कामत देसाई हिच्या ‘सुमीचें कोटांग्री’ हे बाल नवलिकेसाठी प्राप्त झाला आहे.
श्रीमती श्रध्दा गरड हिच्या ‘काव्य परमळ‘ या कविता संग्रहास युवा साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. काव्य परमळ हे पुस्तक गोवा कोंकणी अकादमीने प्रकाशीत केलेले आहे.
गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष अरुण साखरदांडे यांनी तिन्हीही पुरस्कार मानकऱयांचें त्यांच्या यशासाठी अभिनंदन केलेले आहे आणि भविष्यात त्यांच्या लेखणीतून आणखीही उत्कृष्ट साहित्यकृती निर्माण व्हाव्यात व त्यांना आणखिही मान-पुरस्कार प्राप्त व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.